पाच दिवस इंदुरीकर महाराज यांचे किर्तनांचा कार्यक्रम बंद : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांची आता मराठा आंदोलनात घेतली उडी, मराठा आंदोलनला पाठिंबा

पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेले मराठा आरक्षण आंदोलन हे आता निर्णायक टप्प्यावर आले असून संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणावर सर्वच थरातून पाठींबा मिळत आहे.यात शेतकरी वर्ग.सर्व पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थी मजूर कर्मचारी इतर समाज महिला व वृद्ध पुरुष मंडळी एक ना अनेकजण यात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. याताच आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उडी घेतली आहे.व मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.इंदुरीकर महाराज हे उद्या पासून सलग पाच दिवस कोणतेही कार्यक्रम न करण्याचा व तसेच कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.