Accident : कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात

कामशेत जवळ जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कामशेतजवळील खिंडीत हा अपघात झाला. कंटेनर, दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक कामशेत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना स्थानिकांनी आणि पोलिसांनी जवळील रुग्णालयात दाखल केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेला कंटेनर दुभाजक तोडून खिंडीच्या जवळील टेकडीवरुन खोल खड्ड्यात कोसळला. या दरम्यान एक दुचाकी आणि चारचाकीला धडक बसली, ज्यामुळे कार आणि दुचाकीवरील प्रवासी जखमी झालेत. जखमींवर सध्या कामशेतच्या महावीर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. कामशेत पोलिस पुढील तपास करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Calves News, Accident News, Calves Social News, latest Calves marathi news and Headlines based from Calves City. Latest news belongs to Calves crime news, Calves politics news, Calves business news, Calves live news and more at Polkholnama.