Accident on pune-satara highway : पुणे-सातारा मार्गावर भीषण अपघात

पुणे-सातारा मार्गावर एक भीषण अपघात घडून आला. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडून आला. दोन ट्रक एकमेकांना धडकल्यामुळे एका ट्रकची डिझेल टाकी फुटली. त्यामुळे दोन्ही ट्रकला भीषण आग लागली आहे. त्यामुळे सातारा-कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
खंबाटकी घाटातील दत्त मंदिरासमोर ट्रक नंबर जी. जे. २७ एक्स ६१९९ या ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. त्यामुळे पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणारा वाहतूक थांबविण्यात आली असून, या महामार्गावरील वाहतूक बोगदा मार्गे वळविण्यात आली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Pune News, Accident on pune-satara highway News, Pune Social News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.