Eknath shinde : हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद ते ध्वजारोहण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde ) यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहत. यावेळी त्यांनी औरंगाबाद मध्ये ध्वजारोहण केले. तसेच त्यांनी मराठवाडा विकासासाठी नवनवीन घोषणा जाहीर केल्या.
आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन असून भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल १३. महिन्यांनी मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी अत्यंत चिवटपणे संघर्ष केला. व त्यानंतर १७. सप्टेंबर १९४८ . रोजी निजामशाहीने आत्म समर्पण केले. त्यानंतरच मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून १७. सप्टेंबरला हा दिवस मुक्ती संग्राम दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde ) यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत ध्वजारोहण केले. त्यावेळी बोलताना त्यांनी तेथील विकासाकरता नव्याने विविध घोषणा केल्या. व मुख्यमंत्री म्हणाले की मराठा वाडा मुक्तिसंग्रामात सहभागी होऊन. या संग्रामात आपले रक्त सांडणाऱ्या सर्वच ज्ञात व अज्ञात वीरांना त्यांनी केलेल्या बलिदानाबाबत त्यांनी अभिवादन केले. हा मुक्ती संग्राम लढा सोपा नव्हता मात्र रझाकारीच्या ताब्यातून स्वतःची मुक्तता करून एका स्वातंत्र्याची नवीन पहाट अनुभवण्यासाठी त्या वीरांनी बलिदान दिले. त्याबद्दल महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने. आभार त्यांनी यावेळी मानले. ज्या वीरांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांनी यावेळी विविध घोषणा करून केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छता भारत करीता १२ हजार कोटी रुपये मिळाले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde ) पुढे बोलताना म्हणाले की दुष्काळ कमी झाला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातून कर्नाटकाकडे वाहून जाणारे पाणी हे मराठवाड्याकडे वळविले पाहिजे. विकास कामाचा आढावा आम्ही घेत असतो जे काही कामे आहेत ती लवकरच मार्गी लावली जातील त्याचा प्रयत्न आम्ही करू. मराठवाडा वॉटर ग्रीड सह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे त्यासाठी आम्ही नेटाने प्रयत्न करणार आहेत. हे सरकार प्रत्येक घटकातील समाजाचे सरकार आहे. असेही ते यावेळी म्हणाले. दानवे यांच्या आरोपाला देखील त्यांनी उत्तर दिले एमआयडीसी साठी जे भूखंड दिले आहे. त्याला आपण कोणती स्थगिती दिली नाही. माहिती घेण्याचा फक्त आपण सूचना दिल्या आहेत. ते यावेळी म्हणाले. औरंगाबाद ते वेरूळ मंदिरासाठी १३६ कोटी तर पैठण मधील संत उद्यान पाणीपुरवठा योजना. शिर्डी महामार्ग. क्रीडा संकुल करणार. तसेच जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार. पश्चिम महाराष्ट्रातील पाणी वळविण्याचा मोठा प्रकल्प करणार. जालना पाणीपुरवठ्याचे नूतनीकरण करणार. नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार. तसेच लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद करणार. मराठवाडा वॉटर गिड मधून लातूर साठी मान्यता. दरम्यान दरवर्षी औरंगाबाद मध्ये शाहिद स्तंभाला अभिवादन व ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. शिवसेनेच्या वतीने देखील मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला जाणार आहे व तसेच ध्वजारोहण देखील केले जाणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.