Flight Service Kolhapur to banglore : कोल्हापूर-बंगळूर मार्गावर विमानसेवा उद्यापासून

आजपासून देशातील 20 महत्त्वाच्या शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू झाली आहे. इंडिगो एअरलाईन्सकडून कोल्हापूर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडणारी (कनेक्टिंग) विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर येणार्या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असून उद्योग जगतालाही लाभ होणार आहे.
कोल्हापूर-बंगळूर मार्गावर विमानसेवा उद्यापासून म्हणजेच 13 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. इंडिगो कंपनी (indigo airlines) या मार्गावर सेवा देणार आहे. आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे. बंगळूरमधून हे विमान पुढे कोईमतूरला जाईल. त्यामुळे दक्षिणेकडे राज्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक शिक्षण आणि नोकरी निमित्त जाणाऱ्यांसाठी चांगला पर्याय मिळणार आहे. इंडिगो कंपनीकडून (indigo airlines) सध्या कोल्हापुरातून तिरुपती अहमदाबाद आणि हैदराबाद या मार्गावर विमानसेवा पुरविण्यात येत आहे.
कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-बंगळूर आणि कोल्हापूर-तिरूपती या 4 मार्गांवर थेट विमानसेवा इंडिगो एअरलाईन्सकडून नियमितपणे सुरु आहेत. आता उद्यापासून 13 जानेवारीपासून कोल्हापूर ते बंगळूर आणि पुढे कोईमतूर विमानसेवा सुरू होत आहे. कोल्हापूरपासून देशातील काही प्रमुख शहरांसाठी कनेक्टींग फ्लाईट उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोईमतुर, दिल्ली, गुवाहाटी, इंदूर, जयपूर, कोची, कोलकत्ता, लखनौ, मंगळूर, मुंबई, तिरूअंनतपुरम, त्रिचीरापल्ली आणि विशाखापट्टणम या शहरांसाठी, इंडिगो एअरलाईन्सच्या कनेक्टींग फ्लाईटस् प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
या कंपनीने आता बंगळूर मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या मार्गावरील विमानसेवा बंद होती. कोल्हापूर बंगळूर विमानसेवा पूर्ववत करण्यात येईल असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले होते. दरम्यान, बंगळूर आयटी, तर फौंड्री आणि उद्योगांसाठी कोईमतूर प्रसिद्ध असल्याने कोल्हापुरातील उद्योजक नोकरदार विद्यार्थ्यांची वाहतुकीची चांगली सोय होणार आहे.
कोल्हापूर विमानतळावर चेक इन केल्यानंतर, त्यांना प्रवासाच्या अंतिम ठिकाणापर्यंत बोर्डींग पास मिळेल आणि प्रवाशांचे बॅगेजही परस्पर दुसर्या विमानात चढवले जाईल. अंतिम स्थानावर प्रवाशांना त्यांचे लगेज मिळेल. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून प्रवास करणार्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. कोल्हापुरातून देशातील 20 प्रमुख शहरांमध्ये इंडिगो एअरलाईन्सने थेट किंवा अन्य शहरांमार्गे आणि कनेक्टिंग फ्लाईटद्वारे प्रवासी सेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि मानसिक त्रास कमी होणार आहे. आणि ही मोठी पर्वणीच उघोग विश्वासाठी ठरणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.