Soshal. : रेल्वे इंजिनिअरिंग बाॅल्क मुळे लोकल च्या चार फेऱ्या रद्द.

पुणे.दिनांक २६.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) रेल्वेच्या कामा साठी इंजिनिअरिंग बाॅल्क मुळे दिनांक २६.जून ते २९.जून दरम्यान दुपारच्या सत्रात लोणावळा स्थानांका वरून पुणे जंक्शन व पुणे जंक्शन वरून लोणावळा स्थानांका वर जाणाऱ्या दोन लोकल आप आणी डाऊन अशा एकूण चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहीती रेल्वे प्रशासनाकडून दिलेल्या परिपत्रकात म्हणले आहे.
दरम्यान लोणावळा स्थानांका वरून सकाळी १०.०५.ची लोकल सुटल्या नंतर पुढची लोकल ही ५.३०.वाजता म्हणजेच तब्बल साडेसात नंतर सुटणार आहे दरम्यान लोणावळा स्थानांका वरून दुपारच्या वेळेस सुटणाऱ्या २.५०.व ३.३० वाजता सुटणाऱ्या या दोन लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे रेल्वे जंक्शन वरून सकाळी सुटणाऱ्या ९.५७. व ११.१७.वाजता सुटणाऱ्या दोन लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. अशा आप व डाऊन मिळून चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द झालेल्या लोकल ट्रेन मुळे आप आणी डाऊन करणाऱ्या असंख्य कामगार. विद्यार्थ्यांसह व्यापारी वर्गाचे प्रचंड असे हाल होणार आहेत
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.