Bharati Vidyapeeth : भारती विद्यापीठातील रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद. वाहतूकनियमांबाबत जागरूक राहावे: पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर

पुणे: प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे वाहतूक पोलिस व भारती विद्यापीठ एरंडवणे कॅम्पसने आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रमाला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला.रस्ता सुरक्षा नियमावलीबाबतच्या स्टिकर्सचे अनावरण यावेळी करण्यात आले. विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे वाहतूक पोलिस शाखा उपायुक्त विजयकुमार मगर, प्रादेशिक परिवहन अधिकारी' डॉ.अजित शिंदे, 'भारती विद्यापीठ परिवार' चे अध्यक्ष बाबा शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.'भारती विद्यापीठ परिवार ' चे अध्यक्ष बाबा शिंदे,भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ.पवार, डॉ. महाडिक यांनी संयोजन केले.'
विजयकुमार मगर म्हणाले , 'अपघातांचे प्रमाण वाढत आहे. मृत्यू वाढत आहेत.आपण सर्वांनी वाहतूक नियमां बाबत जागरूक राहून काळजी घेतली पाहिजे. जाणीवपूर्वक नियम तोडणारांवर इथून पुढे कडक कारवाई होणार आहे. '' आपले कुटुंब, समाज डोळ्यासमोर ठेऊन सुरक्षितपणे वाहने चालवावित. शरीरशास्त्र आणि वाहनाची गती याची सांगड घालावी', असे आवाहन डॉ. अजित शिंदे यांनी केले. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना भारती विद्यापीठाकडून ' मानवता पुरस्कार ' दिला जात असल्याची माहिती बाबा शिंदे यांनी यावेळी दिली.
डॉ. विवेक रणखांबे यांनी प्रास्ताविक केले.डॉ.भारती जाधव, डॉ. स्वाती देसाई यांनी सूत्रसंचालन केले.न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उज्वला बेंडाळे यांनी आभार मानले.शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम न्यू लॉ कॉलेज सभागृह( भारती विद्यापीठ एरंडवणे कॅम्पस) येथे झाला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.