Soshal : पत्रकारांच्या प्लास्टिकमुक्त सिक्कीम राज्याच्या अभ्यास दौरा करिता आयुक्त शेखर सिंह यांचा हिरवा सिग्नल

पुणे दिनांक ३.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन२०१९.साली संपूर्ण भारतात प्लास्टिकमुक्त भारताचा नारा दिला होता .पंरतु सर्व प्रथम सिक्कीम राज्याने प्लास्टिकमुक्त सिक्कीम असा आदर्श घालून दिला होता. त्यामुळे संपूर्ण भारतात प्लास्टिकमुक्तीचा आदर्श प्रस्थापित केला आहे.
सिक्कीम राज्याने प्लास्टिकमुक्त राज्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. हे बारकाईने समजून घेण्यासाठी साठी व निरीक्षण करण्या साठी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघा तर्फे सराव दौरा आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात एक पत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना देण्यात आले होते. केंद्र सरकारच्या जनजागृती अभियानच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील पत्रकारांसाठी सिक्कीम साठी अभ्यास दौरा आयोजित करावा. अशी विनंती आयुक्ता कडे पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू साहेब गोरे. यांनी केली होती. या पत्रकार अभ्यास दौरा करिता आयुक्तांनी परवानगी दिली आहे. असे गोरे यांनी माध्यमांशी बोलातांना सांगितले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अनेक वर्षांनपसून प्लास्टिकमुक्तशहरा साठी पर्यंत्न करीत आहेत. पंरतु प्रशासनाला यश आले नाही. आजही शहरात प्लास्टिकचा वापर होत आहे. शहरात दंड करून देखील यात सुधारणा झाल्या नाहीत. व शहरात पूर्ण पणे प्लास्टिकचा वापर बंद झाला नाही.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातीलपत्रकारांसाठी साठी सिक्कीम अभ्यास दौरा आयोजित केल्यास सिक्कीम राज्यांतील प्लास्टिकमुक्त करण्या साठी तेथील अधिकारी यांनी केलेले पर्यायाची अभ्यास दौरा मध्ये पत्रकार घेतील. व ती माहिती नागरिकांना दिली जाईल. असे अनेक पत्रकारांच्या वतीने व्यक्त करण्यात आले. व बाबत तशी जनजागृती बातम्यांन द्वारे केली जाईल. या बाबत पत्रकारांच्या सिक्कीम दौरा करिता आयुक्तांनी प्राधान्य द्यावे अशी मागणी पत्रकार बापू साहेब गोरे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.