Dr Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे महादेव बोत्रे, मनोज माछरे, उमेश बांदल, बालाजी ऐयंगार,शेखर गावडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी परिसरातील तसेच दापोडी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. एच.ए. कॉलनी येथील कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, माजी नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा धर सामाजिक कार्यकर्ते संजय केंगले, रमेश जाधव, मिलिंद जाधव, रवि कांबळे, सुरेंद्र पासलकर, मारोती बोरावले,सुनील थोरात, सुनिता शिवतारे, सुरेश केंगले यांच्यासह कंपनी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. तर, दापोडी येथील कार्यक्रमास पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उप निरीक्षक बालाजी झोनापल्ली, माजी नगरसदस्य राजू बनसोडे, रोहित अप्पा काटे, संजय काटे, माजी नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.