Mansoon : ठाण्यात मुसळधार पाऊस सुरूच .मुंब्र्यात सकाळी दरड कोसळली ४५ कुंटूबांचे स्थलांतर

पुणे दिनांक २८ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंब्र्यात दरड कोसळल्याने या भागातील ४५ कुंटूबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या दरड कोसळल्या नंतर मात्र यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. आता पर्यत २२००मि.मी.पेक्षा जास्त पाऊस या भागात झाला आहे. अजून या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. ठाणे येथे काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या व भिंत पडण्याची घटना घडली आहे.
दरम्यान आज मुंब्र्यात बायपास रोडवर मुंब्रा देवी जवळ डोंगराळ भागात असलेल्या एका वस्ती जवळ एक दरड कोसळली सुदैवाने या दुर्घटनात कोणीही जखमी झाले नाही. या भागातील एकूण ४५ कुंटूबांना जवळील मंदिर व मस्जिद मध्ये स्थंलातर करण्यात आले आहे. ही जागा वनविभागांची आहे.या मुळे वनखात्याच्या अधिकारी. ठाणे महानगरपालिका अधिकारी व एन डी आर एफ चे अधिकारी या तिन्ही विभागांचे पथक घटना स्थळावर तैनात केले होते.ठाणे येथे आज सकाळ पर्यंत १००.मि.मी पाऊस झाला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.