Soshal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन

पुणे दिनांक १ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) शहर व मध्यमवर्गीय जीवनशैली विषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांच्या जीवन सुकार करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे लागेल. त्यादुष्टीने पुणे शहरात मेट्रो सुरू करण्यात आली असून मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा बनत आहे.असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या टप्पा २ चा पूर्ण झालेल्या २ मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले .शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मेट्रो लोकार्पण व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अंतर्गत कच-यापासून ऊर्जा निर्माण करणा-या ( वेस्ट टू एनर्जी ) संयंत्राचे उदूघाटन पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लाभाथ्यांना हस्तांतरण पिंपरी चिंचवड मनापा व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या घराचे भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री अजित पवार. देवेंद्र फडणवीस. पालकमंत्री चंद्रकांत पाटील. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील. विधानपरिषदेच्या सभापती डाॅ. नीलम गो-हे व चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.