Inauguration of khadak police station : पुणे पोलिस आयुक्तांच्या हस्ते खडक पोलिस ठाणे अंमलदार कक्षाचे उद्घाटन

पुणे पोलिस आयुक्त यांच्या हस्ते खडक पोलिस ठाणे अंमलदार कक्षाचे बुधवारी (ता. २५) उद्घाटन करणअयात आले. यावेळी पोलिस अधिकाऱयांसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
खडक पोलिस स्टेशनमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या ठाणे अंमलदार कक्षाचे उद्घाटन सोहळा पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते पार पडला. खडक पोलिस स्टेशन हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्या कारणाने पोलिस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांची योग्य ती व्यवस्था व्हावी म्हणून नवीन ठाणे अंमलदार कक्ष, बसण्याकरिता बाकडे व इतर सोयी सुविधा करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त झोन 2 संदीप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलिस आयुक्त फरसखाना विभाग सतीश गोवेकर, संगीता यादव वरिष्ठ पोलिस निरीक्षक खडक पोलिस स्टेशन, राजेश तटकरे पोलिस निरीक्षक गुन्हे खडक पोलिस स्टेशन पुणे व खडक पोलिस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार हजर होते. या वेळी पोलिस आयुक्त यांनी खडक पोलिस स्टेशन येथे तयार करण्यात आलेल्या हँगिंग गार्डन चे कौतुक केले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.