एसटी आंदोलन मागे एसटी धावणार : राज्य सरकार व एसटी कामगार संघटना यांच्यात चर्चेत तोडगा बेमुदत संप मागे

पुणे दिनांक १२ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम ) राज्य सरकार व एसटी कामगार संघटना यांच्यात चर्चे अंती सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले आहे.या चर्चा मध्ये राज्य सरकारच्या वतीने कामगारांनरांचा पगार व इतर आर्थिक भत्ते संदर्भात समिती गठीत करण्यात आली आहे.या समिती मध्ये वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव व परिवहन विभागांचे प्रधान सचिव एसटीचे उपाध्यक्ष तसेच व्यवास्थापकीय संचालक यांचा समावेश असणार आहे.
दरम्यान उपोषण कर्ते एसटी कामगार संघटना यांच्या या मागणीसाठी राज्य सरकार व संघटना प्रतिनिधी यांच्यात मध्यरात्री चर्चा झाली आहे.समिती येत्या दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश व त्यानंतर राज्य सरकार व कामगार संघटना म्हणून निर्णय घेणार एसटी कामगार यांना १० वर्षासाठी सातवा वेतन आयोग देणे कामगार करार. व थकबाकी.मुळ वेतनातील ५००० रुपये.४०००.आणी २५०० मधील तफावत दूर करणे . तसेच सेवावृत्त कामगारांची थकलेली देणी संदर्भात अहवाल सादर करणार आहे.व सप्टेंबर पेड इन ऑक्टोबरच्या वेतना पासूनचा महागाई भत्ता हा ३४ टक्क्यावरुन ४२ टक्के देण्यात येणार आहे.त्यामुळे आता सणासुदीच्या काळात एसटी सेवा नियमित राहणार आहे.व प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.