Karha river floods : प्रचंड पावसामुळे कऱ्हा नदीला पूर . पुरामुळे पुणे- बारामती रस्ता वाहतुकीसाठी बंद

बारामती मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पण तिचा पाऊस चांगलाच बरसत असल्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसत आहे. या भागामध्ये रात्रीच्या सुमारास चांगलाच पाऊस झाल्यामुळे पावसाने अनेकांची धांदल उडविले आहे. तुफान असा पाऊस झाल्यामुळे. पाणी रोडवर मोठ्या प्रमाणात साचले. व अनेक जण यात चांगलेच अडकून पडले. व रोड वरून प्रचंड पाणी वाहत असल्यामुळे. बारामती ते पुणे रस्ताच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
काही भागात काल अचानकपणे झालेल्या ढगफुटी सारखा पावसामुळे रोडवरच कमरे एवढे पाणी साचल्याने वाहन धारकाला त्याचा चांगलाच फटका बसून त्यांना या पाण्याचा सामना करावा लागला. संपूर्ण भागात ओढा व नाल्यांना देखील पाण्याचा पूर आला आहे. व ते पाणी रोड वरून वाहत आहे. कऱ्हा नदी ओसंडून वाहत आहे. नदीकाठच्या लोकांना अलर्ट राहण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले असून त्यातील अनेक लोकांचे स्थलांतर देखील करण्यात आले आहे. तर शेतामध्ये सर्वत्र पाण्याचे तळेच निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड प्रमाणात मोठे नुकसान झाले आहे. तसेच कऱ्हा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड पणे वाढ झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव बारामती ते पुणे रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून. दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. अशी माहिती प्रशासनाच्या सूत्राद्वारे देण्यात आली असून सदरच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही असे कळते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.