School Bus hit a tree : खंडाळा : विद्यार्थ्यांसह बस झाडावर आदळली, जीवितहानी नाही

ब्रेक फेल झाल्याने स्कूल टूर बसला अपघात झाला. एकवीरा देवी आणि गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या स्कूल टूर बसला शिंगरोबा मंदिराच्या मागील घाटात अपघात झाला. सुदैवाने बस झाडावर आदळल्याने मोठी दुर्घटना टळली. सहा शिक्षक आणि इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतचे ६४ विद्यार्थी बसमध्ये होते.
अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार, वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक गौरी मोरे, बोरघाट पोलिसांचे पीएसआय योगेश भोसले व महेश चव्हाण, आयआरबीचे सुरक्षा अधिकारी शिंदे, सामाजिक संस्थांचे सदस्य, पोलिस कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलांना खाऊ-पाणी दिल्यानंतर सर्व मुलांना सुखरूप गगनगिरी महाराज मठात नेण्यात आले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Pune News, School Bus hit a tree News, Pune Social News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.