Soshal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पुणे दिनांक १ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज. वीर चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत. अशा भूमीत लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे ते आपले सौभाग्य आहे. विद्याचे माहेरघर असलेल्या पुण्यभूमीत मिळणारा पुरस्कार हा आपला सन्मान आहे. या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स.प.महाविद्यालयात पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस जेष्ठ नेते व खासदार शरद पवार. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचेअध्यक्ष डाॅ दीपक टिळक. विश्वस्त सुशीलकुमार शिंदे. डाॅ रोहित टिळक. गीताली टिळक. डाॅ प्रणती टिळक. आदी मान्यवर उपस्थित होते. स्मृतिचिन्ह .मानपत्र व १ लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याची दिशा बदलावी .देशाची संस्कृती व परंपरा महान असल्याचा विश्र्वास लोकांना मध्ये निर्माण केला .देश स्वतंत्र होऊ शकतो हा विश्वास लोकांना मध्ये पहिल्यांदा निर्माण केला. देशा समोर सहकार्याचे मोठे उदाहरण ठेवले. स्वातंत्र्य लढ्यातील वर्तमानपत्राचे मह्त्व ओळखून त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांसोबत लढा देतांनाच समाजातील वाईट प्रथांविरोधातही त्यांनी लढा दिला.
न्यू.इंग्लिश स्कूल. डेक्कन एज्युकेशन सोसायटी. फर्ग्युसन महाविद्यालयासारख्या संस्थांची स्थपना केली ही त्यांची दूरदृष्टी दर्शवून देते.या संस्थेतून असे किती युवा निघाले ज्यांनी टिळकांचे मिशन पुढे चालवले.राष्ट्रनिर्मानमध्ये आपली भूमिका बजावली. व्यवस्था निर्मितीकडून संस्थांची निर्मिती. संस्थानिर्मितून व्यक्तीनिर्मिती व व्यक्तीनिर्मितून राष्ट्रनिर्मिती हे व्हिजन राष्ट्राच्या भविष्यासाठी पथदर्शी असते .त्यावर आज देश प्रभावीपणे वाटचल करत आहे. देशातील लोकांच्या विश्रासाने आणि प्रयत्नांमुळेच देश आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे मोदी म्हणाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे मिळणा-या पुरस्काराची रक्कम नमामी गंगे प्रकल्पाला देत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.