Lonavala liquor stock : लोणावळा : खंडाळ्यातून ६८ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त

लोणावळा, 30 डिसेंबर 2022: खंडाळा शिवाजी पेठेत शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे 1.00 वाजेच्या सुमारास देशी-विदेशी दारूचा अवैध साठा करून त्याची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडून 68,220 रुपयांचा माल जप्त केला.
या प्रकरणी खंडाळा पोलीस चौकीत नियुक्त असलेले लोणावळा शहरातील पोलीस हवालदार मयूर आबनावे यांनी फिर्याद दिली असून अजय रामचंद्र जांभुळकर (56, रा. शिवाजी पेठ खंडाळा) याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
जांभुळकर यांच्याकडून 52 प्रकारच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वांची किंमत 68,220 रुपये असल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक सीताराम दुबल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुजावर करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.