भूकंपाचे सौम्य धक्के : आज सकाळी कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के.

पुणे दिनांक १६ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व सातारा सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे.सदरचा भूकंपाचा ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे.नॅशनल सेंटर फॉर सिस्माॅलाॅजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून ५ किमी खाली होता .व कोल्हापूर पासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.आज सकाळी १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हे भुकंपाची धक्के जाणवले आहेत.
दरम्यान यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण शहर आणि लगतच्या गांवांमध्ये भूकंपाचा धक्का पहाटे ६ वाजून ४० मिनिटांनी जाणवले माॅर्निग वाॅकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना मध्ये या भूकंपाच्या धक्क्याने भीतीचे वातावरण पसरले.कोयना धरणापासून २० किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान धरण सुरक्षित आहे.या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.