MLA Laxman Jagtap passed away : आमदार लक्ष्मण जगताप काळाच्या पडद्याआड

दीर्घ काळापासून कर्करोगाने आजारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जपताप यांचे मंगळवारी (३ जानेवारी) निधन झाले.
लक्ष्मण जगताप (वय ६०) हे चिंचवड विधानसभा मतदारर संघाचे तीन वेळा आमदार राहिले.
गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने आजारी होते. परदेशात उपचार करून आणल्यानंतर देखील त्यांचा त्रास कमी झाला नाही. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरुच होते. परंतु उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी सुरुवातीच्या उपचारादरम्यान रुग्णालयात जावून त्यांची व कुटुबियांची भेट घेतली होती.
काही दिवसांपूर्वीच कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं होतं. आणि आता लक्ष्मण जपताप यांच्या निधनाने भाजपला दुसरा मोठा धक्का बसलाय.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जगताप यांनी १९८६ मध्ये कॉंग्रेसपासून राजकीय कारकिर्द सुरु केली. महापालिकेत सलग ४ वेळा ते पिंपळे गुरव प्रभागातून निवडून गेले. त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष, महापौर अशी पदे भूषविली. महापौर झाल्यानंतर त्यांनी २००३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्षपद भूषविले. तर; पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर २००४ मध्ये निवडून गेले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या छुप्या पाठींब्यावर २००९ मध्ये व त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर ते आमदार झाले.
जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. प्रशासनावर वचक असलेला आक्रमक नेता भाजपने गमावला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.