गणेशोत्सव नियोजन बैठकीचे आयोजन : उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभाग घ्यावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दिनांक २८ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग मार्फत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.अधिकाधिक मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात गणेशोत्सव नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.
दरम्यान यावेळी आमदार माधुरी मिसाळ.विभागीय आयुक्त सौरभ राव.पोलिस आयुक्त रितेश कुमार.पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे.पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख.पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की गणेशोत्सव साजरा करतांना वाहतुकीला अडथळा येणार नाही याची दक्षता सर्वच गणेश मंडळांनी घ्यावी तसेच मेट्रो प्रशासनाने उत्सव काळात मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याबाबात विचार करावा गणेश मूर्तीच्या उंचीवर शासनाने कोणतीही मर्यादा घातलेली नाही.मात्र गणेश मूर्ती विसर्जन करताना प्रदुषण होणार नाही व उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल याची दक्षता घ्यावी.गणेश मूर्ती संकलनात जनतेच्या भावनांना धक्का लागणार नाही याकडेही लक्ष द्यावे.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की गणेश मंडाळाकडून महानगरपालिकेने कमानीसाठी कोणताही कर घेऊ नये.महानगरपालिकेने गणेश मंडाळाशी समन्वय साधून त्यांच्या समस्या दूर कराव्यात तसेच सर्वीांनी मिळून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले गणेशोत्सवासाठी वाहतूक नियमण. पार्किंग व्यवस्था.सीसीटिव्ही कॅमेरे याबाबत योग्य ते नियोजन करण्यात येत आहे.गणेशोत्सवासाठी व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहे.गणेशोत्सावासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी काळजी घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.आयुक्त विक्रमकुमार यांनी गणेश मंडळांना ५ वर्षासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले.उत्सवा दरम्यान वाहनतळासाठी अतिरिक्त करण्यात येईल . असेही ते म्हणाले.यावर्षीगणेशोत्सवा साठी जिल्हा प्रशासनाने दिनांक २३.२४.२६.२७ व २८ सप्टेंबर रोजी ध्वनिक्षेपक.वापरासाठी रात्री १२ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.मगील वर्षी ३ हजार ५६६ गणेश मंडळांची नोंदणी झाली होती.यावर्षीही तेवढ्याच प्रमाणात गणेश मंडळाद्वारे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.अशी माहिती त्यांनी दिली आहे.बेठकीसाठी विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी.व विविध विभागांचे अधिकारी होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.