MSRDC चा राज्य सरकारला पाठवला प्रस्ताव : मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गा आता होणार आठपदरी; प्रचंड वाहतूक कोंडी वाढल्यानं रस्ते महामंडाळाचा निर्णय

पुणे दिनांक ११ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई ते पुणे एक्स्प्रेसवे आता लवकरच आठ पदरी होणार आहे.तसा प्रस्तावच रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारला दिला आहे.या एक्स्प्रेसवेवरील वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढली आहे .व वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
दरम्यान याप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हा मार्ग आता आठ पदरी करण्याचा प्रस्तावच राज्य सरकारला दिला आहे.सरकारने तातडीने ह्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास एंकंदरीत वर्षा भरात कामाला सुरुवात होऊ शकते.एकीकडे वेगाने काम सुरू असलेला मिसिंग लिंक प्रकल्प व दुसऱ्या बाजूला आठ लेन करण्याचा प्रस्ताव.यामुळे आता मुंबई वरुन पुण्याला व पुढे सातारा.कोल्हापूर व पुढे कोकणात व गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.