Navratri Festival : पुणे शहरात सोमवार 26 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव वास सुरुवात होत आहे त्यामुळे वाहतूक विभागाने यामध्ये बदल केले आहेत

5 ऑक्टोंबर पर्यंत नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो याच कालावधीत चतुर्श्रुंगी मंदिर भवानी माता मंदिर तांबडी जोगेश्वरी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याच्या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थित बदल केले आहेत.
बदल सोमवारपासून लागू होतील
आप्पा बळवंत चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून बुधवार चौक ते आपापोवन चौकशी एकेरी वाहतूक चालू राहील. पर्यायी मार्ग बुधवार चौकातून चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात येऊन आप्पा म्हणून चौकामधून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रोडने सरळ इच्छित स्थळी जाईल भवानी माता मंदिर रामोशी गेट चौक ते जुना मोटर स्टॅन्ड यादरम्यानच्या भवानी माता मंदिरा समोरून महात्मा फुले रस्ता आवश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही बाजूने बंद करण्यात येणार असून या महात्मा फुले रस्त्यावरील पार्किंग बंद करण्यात यावी तसेच वाहन चालकांनी पंडित नेहरू रोडवरील व इतर रोडवरील पार्किंग झोन मध्ये आपली वाहने पार्किंग करावी पर्यायी मार्ग संत कबीर चौक मार्गाने रामोशी गेट चौकातून बवाना भवानी माता रोडनी जाणाऱ्या वाटचालकांनी एडी कॅम्प चौकातून डावीकडे वळून भारत सिनेमा पदमजी चौकी चौक उजवीकडे वळून जुना मोटर स्टॅन्ड पर्यंत येऊन पुढे जावे. ढोले पाटील चौक बाजूने येऊन रामोशी गेट चौकासमोरून भवानी माता मंदिर रस्त्याने जुन्या मोटर स्टॅन्ड कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी भगवान बाहुबली चौकातून जुना मोटर स्टॅन्ड कडे जावे यासाठी माणिकदास महाराज चौक ते भगवान बाहुबली चौक यादरम्यानच्या जाधव रस्त्यावरील एकेरी मार्ग वाहतूक निर्बंध नवरात्र उत्सव कालावधी पुरता शितल करण्यात येत आहे
तसेच रामोशी गेट येथून जाणाऱ्या पीएमपीएल बसेसची वाहतूक सेव्हन लव्हज चौकातून पुलगेट कडे डायवर्षण करण्यात यावी जेणेकरून नवरात्र उत्सव दरम्यान भवानी माता मंदिर या भागात वाहतूक कोंडी होणार नाही सेव्हन लव्हज चौकातून येणारी वाहतुकी गोळीबार मैदानाकडे वळविण्यात यावी मालधक्का चौकाकडून येणारी वाहतूक ही आरटीओ पुणे स्टेशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी वळविण्यात यावी.बोल्हाई चौकातून जाणारी वाहतुकी मालधक्का चौक येथे वळवण्यात यावी. ट्रेझरी शाखे समोरील बरक्याळीत जाणारी वाहतुकी बोल्हाई चौकातून मालधक्का चौकाकडे वळविण्यात यावी. तसेच बॅनर्जी चौकातून पावर हाऊस चौक येथे जाणारी वाहतुकी बंद करण्यात यावी.पाच समर्थ वाहतूक विभागा मध्ये दिनांक २६ सप्टेंबर रोजी एकूण १८. नवरात्र मंडाळाच्या मिरवणूका दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी ९ मिरवणूका तसेच ९ ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पौर्णिमा दिवशी १५ मिरवणूका या भवानी पेठ रामोशी गेट एडी कॅम्प चौक तसेच नरपत गिरी चौक या भागातून जाणार असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तांबडी जोगेश्वरी लक्ष्मी रोडवरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर यादरम्यानचा तांबडी जोगेश्वरी रोडवर प्रवेश बंद करण्यात येत आहे. सकाळ प्रेस कडून जोगेश्वरी मंदिराकडे जाण्यास अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग लक्ष्मी रोड ने गणपती चौकात येऊन जोगेश्वरी मंदिराकडे वळणारे वाहन चालकांनी सरळ सेवा सदन चौकाकडे उजवीकडे वळून बाजीराव रोडने आप्पा बळवंत चौक उजवीकडे न वळता सरळ शनिवार वाडा मार्गे पुढे जावे. तांबडी जोगेश्वरी ३३ बुधवार पेठ पुणे 2 अष्टभुजा देवी मंदिर 424 शनिवार पेठ पुणे तीन अष्टभुजा दुर्गा देवी ६२४ नारायण पेठ पुणे. या ठिकाणी नवरात्र उत्सवातील दहा दिवसा करिता अत्यावश्यक सेवा खेरीज करून आवश्यकतेप्रमाणे सर्व प्रकारचे वाहनांचे पार्किंग करिता बंदी करण्यात येत आहे. तसेच यापूर्वी या रस्त्यावर असणारी पार्किंग व्यवस्था नमूद कालावधी करिता स्थगित करण्यात येत आहे. देवीच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग करिता टिळक फुलते भिडे पूल दरम्यानच्या नदीपात्रातील रोडवर मंडई मधील मिनव्ह व आर्यन कै. सतिश मिसाळ पार्कींग तळावर लावावीत .
चतुःश्रृंगी माता देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते सेनापती बापट रोड वर वाहतूक कोंडी झाल्यास पत्रकार नगर चौकाकडून सेनापती बापट रोड जंक्शन कडे येणारी वाहतूक ही आवश्यकतेप्रमाणे शिवाजी हौसिंग चौकातून सेनापती बापट रोड डाव्या बाजूने एकेरी सोडण्यात येईल. सदर रोडवर गर्दी वाढल्यास आवश्यकतेप्रमाणे मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरील वाहने चतुर्शिंगी मंदिराकडे न सोडता वेताळबाबा चौकातून दीप बंगला चौक मार्गे तसेच शिवाजी हाऊसिंग चौकामधून उजवीकडे वळविण्यात यावी व सुपर मार्केट मार्गे सोडण्यात येतील. कॉसमॉस जंक्शन कडून सेनापती बापट रोडवर येणाऱ्या भाविकांनी मैदानावर पार्किंग कडे जाणाऱ्या जाण्यासाठी शिवाजी हाउसिंग चौकातून उजवीकडे वळून ओमसुपर मार्केट मार्गे सोडण्यात येतील कॉसमॉस जंक्शन कडून सेनापती बापट रोडवर येणाऱ्या भाविकांनी त्यांची वाणी पॉलिटेक्निक मैदानावर पार्किंग कडे जाण्यासाठी शिवाजी हाउसिंग चौकाकडून डाव्या बाजूस वळून कै.सांवत चौकामधून फिरोदिया पत मार्गी घेऊन जावे तसेच वीर चापेकर चौकातून चतुर्शिंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या वाहनचालकांनी त्यांची वाहने सूर्यमुखी दत्त मंदिर चौकातून डाव्या बाजूने थोरात चौकातून दीप बंगला चौक मार्गे व गणेश खिंड रोडवरील संगण्णा धोत्रे पथ व खाऊ गल्ली मार्गे पॉलिटेक्निकल पार्किंग गेटकडे घेऊन जावे. असे आव्हान पुणे शहर पोलीस उपयुक्त वाहतूक विभागाचे राहुल श्रीरामे यांनी एक प्रसिद्ध पत्रकार द्वारे ही माहिती कळविली असून नागरिकांनी नवरात्र उत्सवामध्ये या सूचनांचे योग्य असे पालन करावे व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.