Jayastambha Salutation : दि.01/01/2023 रोजी पेरणेफाटा येथील जयस्तंभ अभिवादन बंदोबस्तबाबत

पेरणे फाटा जयस्तंभ येथे 01 जानेवारी रोजी शौर्यदिन असल्याने मोठया प्रमाणात अनुयायी जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात त्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस दलाकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पुर्ण तयारी केली आहे. शौर्यदिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलीस दल, पुणे ग्रामीण पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, मनपा पुणे, जिल्हा परिषद पुणे, आरोग्य विभाग, पी.एम.पी.एल., बार्टी, अन्न व औषध प्रशासन विभाग, समन्वये बैठका घेण्यात आल्या असुन सर्व विभागात योग्य तो समन्वय ठेवण्यात येत आहे. जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणारे विविध संघटनांशी चर्चा करुन समन्वय साधण्यात आला आहे. शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आहे. जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणारे अनुयायी यांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणुन पुणे नगर रोड, तसेच पेरणे जयस्तंभाकडे येणारे रोडवरील वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच अनुयायी यांचे वाहनांसाठी पेरणे जयस्तंभापासुन काही अंतरावर दु-चाकी व चार-चाकी वाहनासाठी 20 पार्कीग स्लॉट तयार करुन पार्कींगची व्यवस्था करण्यात आली असुन पार्कींग ठिकाणापासुन जयस्तंभा पर्यंत अनुयायी यांना पी एम पी एल बसमधुन जाणेची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन जयस्तंभ परिसरात सर्वत्र 240 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गुन्हेगारावर निगराणी ठेवण्यासाठी 05 स्पॉटर किट व्हॅन लावण्यात आलेल्या आहेत. तसेच व्हिडीओ कॅमेरा व ड्रोन कॅमेराच्या माध्यमातुन संपुर्ण कार्यक्रमाची निगराणी करण्यात येणार आहे.
जयस्तंभास अभिवादन करण्यसाठी येणारे अनुयायांची सुरक्षा व बंदोबस्त महत्व लक्षात घेवुन यावर्षी मा. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पुणे शहर पोलीस दलाचे मदतीसाठी बाहेरुन पोलीस अधिकारी , पोलीस अंमलदार, होमगार्ड व एस.आर.पी.एफ कंपनी,रॅपीड अॅक्शन फोर्स असा बंदोबस्त प्राप्त झाला आहे. यावर्षी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातुन मा. पोलीस आयुक्त व मा. पोलीस सह आयुक्त यांचे नेतृत्वात 04 अपर पोलीस आयुक्त, 15 पोलीस उप आयुक्त, 21 सहाय्यक पोलीस आयुक्त, 90 पोलीस निरीक्षक, 250 सपोनि/पोउनि, 4000 पोलीस अंमलदार, 11 बीडीडीएस ची पथके, 06 क्युआरटी हिट्स, 05 आरसीपी स्ट्रायकिंग, 1000 होमगार्ड व एसआरपी च्या 08 कंपनी असा पेरणे जयस्तंभ परिसर तसेच संपुर्ण पुणे शहर हद्दीत बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पेरणे जयस्तंभ अभिवादन बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली असुन मा. पोलीस आयुक्त व मा. पोलीस सह आयुक्त यांनी प्रत्येक बंदोबस्त ठिकाणाला भेट देवुन अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या आहेत. पेरणे जयस्तंभ परिसरात गोपनिय यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवावर वि·ाास न ठेवण्याचे पोलीस दलाकडुन आवहान करण्यात येत आहे. समाज माध्यमवरुन कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित न करण्याचे अवाहन करण्यात येत आहे. पेरणे जयस्तंभ परिसरात कोणी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास सक्त कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही आक्षेपार्ह माहीती मिळाल्यास नागरीकांनी तात्काळ पुणे शहर नियत्रंण कक्ष फोन नंबर 020-26126296/8975953100 (व्हॉट्सअॅप नंबर), 112 या वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.