Soshal. : ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्त म.ना.पा.व पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.

पुणे.दिनांक ९.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम )श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्य पाश्र्वभूमीवर पोलीस अधिकारी व पुणे महानगर पालीकेचे अधिकारी यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आढावा बैठक संपन्न झाली आहे.
सदरच्या आढावा बैठकीत बोपखेल फाटा ते संगमवाङी पालखी मार्गावर एकूण ४८.टॉयलेट मोबाईल ठेवण्यात येणार आहेत. तसेच ठिक ठिकाणी वारकरी यांच्या साठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील सर्व राडरेडा काढण्यात येणार आहे.व रोडवरील खड्डे बुजविण्यात येणार आहे.सर्व मार्गावरील स्वच्छता करण्यात येणार आहे.मच्छिमारकेट.व मटण मार्केटची स्वच्छता आरोग्य विभागा मार्फत केली जाणार आहे.पालखी रथाला अङथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्यात येणार आहेत.पालखी मार्गावर कोणलाही विनापरवानगी कमाणी उभारता येणार नाहीत. याची योग्य ती दखल घेण्यात येणार आहे.पालखीच्या विसाव्याचे ठिकाणी फायर ब्रिगेड व अॅमबुलनस ची व्यवस्था करण्यात येणार आहे.तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.व वारकरी करीता फिरता अॅमबुलनस सह आरोग्य स्टाफ सह दवाखाना असणार आहे.व विसाव्याला वाॅच टाॅवर व कॅमेऱ्यची व्यवस्था.स्वयंसेवक ङाॅकटारांची टीम असणार आहेत.
बोपखेल फाटा ते संगमवाडी पालखी मार्गावरील जोडणारे गल्ली बोळ रस्ते उत्तम दर्जेदार बॅरीकेंटींग व विसाव्याचे ठिकाणी बॅरीकेंटींग असणार आहेत. विद्युत विभागाच्यावतीने पालखी मार्गावरील खांबा वरून लोंबकळणाऱ्या तारा. उघड ङी पी. बंदोबस्त करण्यात येणार आहे.दिनांक ११ जुन ते १२ जुन रोजी लोडशेडिंग होणार नाही.याच कालावधीत सर्व प्रकारची मटण. चिकन. मच्छिं मार्केट दुकान दारुचे दुकान व बीयर शाॅपी बंद करण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर महत्त्वाचे अधिकाऱ्याचे मोबाईल क्रमांक लावण्यात येणार आहेत. पालखी सोहळा मार्गावरील मेट्रोचे चालू असलेले काम बंद ठेवण्यात येणार आहे.तसेच ट्राफिकचे योग्य नियोजन करण्यात येईल. सदर बैठकीत अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा. उप आयुक्त परी मंङळ ०४.खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे. शहर उप आयुक्त श्रीमती आरती बनसोडे. म.ना.पा.पुणे शहर श्रीमती किशोरी शिंदे.सहायक पोलीस आयुक्त विषेश शाखा पुणे शहर.राजेंद्र सांळुखे. तसेच विश्रांतवाडी. येरवड . खडकी. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. म.ना.पा.चे सहाय्यक आयुक्त. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त. म.ना.पा.चे आरोग्य अधिकारी. व खाते प्रमुख. अग्निशमन अधिकारी. विद्युत वितरण विभागाचे अधिकारी.पालखी.स्वागत कक्षाचे सर्व प्रतिनिधी.बैठकीत हजर होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.