सामाजिक : जगदगुरू तुकाराम महाराजांची पालखी. दोन तास ऊरूळी कांचनला थांबणार समन्वय बैठकीत निर्णय.

पुणे दिनांक ६ जून ( पोलखोल नामा न्यूज टीम)संतश्रेष्ठ व जगतगुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ऊरूळी कांचन गावा मध्ये येऊन ग्रामदैवत मंदीरा समोर आरती घेणार असून. त्या नंतर पालखी सोहळा महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्या साठी दोन तास थांबणार आहे.
दरम्यान या बाबत हवेलीचे प्रांतअधिकारी संजय आसवले यांनी आज बोलविलेल्या समन्वय बैठकीतच निर्णय झाला आहे.त्या निर्णया मुळे आता ऊरूळी कांचन मधील सव॔ भाविकांना जगदगुरू. तुकाराम महाराजांचे दर्शन घेता येणार आहे.
दरम्यान या बाबत जगदगुरू तुकाराम महाराज संस्थान व देहूचे व अध्यक्ष पालखी सोह प्रमुख व सव॔ विश्वस्त मंडळी जिल्हाधिकारी पुणे .मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह परिषद पुणे. प्रांतधिकारी हवेली. गटविकास अधिकारी. हवेलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. व त्यांचे सहकारी. लोणी काळभोर पोलीस स्टेशन तसेच सव॔ माध्यमांचे पत्रकार व बांधवांनी जे सहकार्य केले .त्या बद्दल ऊरूळी कांचन ग्रामस्थ. ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच. सदस्य. ऊरूळी कांचन देवस्थान समितीच पदाधिकारी विश्वस्त श्री काळभैरवनाथ सेवा समितीचे पदाधिकारी. व सव॔ सभासदाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.