Mansoon : कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर. कोल्हापूर-गगन बावडा मार्गही बंद

पुणे दिनांक २३ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीचे पाणी हे गायकवाड वाड्या पर्यत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज दुपारी पर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ व धोका पातळी ४३ फूट आहे.जिल्ह्यातील एकूण ८२ बंधारे पाण्या खाली गेले आहेत.
पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. त्या मुळे जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे.नदी काठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनबरोबर ग्रामपंचायतीकडून वेळीच स्थलांतरित होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक पुराचा फटका बसणा-या आंबेवाडी व चिखली या गावात ग्रामपंचायतीच्या वतीने स्पीकरच्या सहाय्याने आवश्यक साहीत्य घेऊन आज सांयकाळ पर्यंत गाव सोडण्याची दवंडी दिली आहे. धरणसाठ्यात वाढ झालेले सांगितले जात आहे.
दरम्यान हवामान खात्याच्यावतीने कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊसांचा इशारा देण्यात आला आहे. व २६ जुलै पर्यत ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. गगन बावड्या सर्वाधिक पाऊस झाला असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात ४६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गगनबावडा तालुक्यात २४ तासात सर्वाधिक १०५.४मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २२राज्यमार्ग आहेत .तर त्या मधील ८ मार्ग बंद पडले आहेत.प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या १२२ पैकी १७ मार्ग हे बंद आहेत. त्यामुळे एकूण २५ मार्ग बंद आहेत. जिल्ह्यात एकूण ५४ घरांची पडझड झाली आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाचे पाणी वाढत चालल्याने कोल्हापूर - गगनबावडा मार्गा वरील मांडूकली व लोंघे गावातील मार्गावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतूकी साठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून कोकणसह .गोवा.पणजी. तळेरे.रत्नागिरी. सिंधुदुर्ग. ठिकाणी होणारी वाहतूक बंद झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.