Parle-G biscuit packet changes : Parle-G बिस्किट पॅकेटचे बदलं रुप: सोशल मीडियावर केला दुख: व्यक्त

Parle-G बिस्किटचे चाहते असाल तर ही बातमी धक्कादायक आहे. काही उत्पादने अशी असतात की जणू ती अमर आहेत आणि ती कधीही संपणार नाहीत, त्यापैकी एक म्हणजे पार्ले-जी बिस्किट प्रत्येकाच्या हृदयाचा राजा आहे. आता बाजारात अनेक प्रकारची नवीन बिस्किटे आली असली तरी आजही पार्ले-जी बिस्किटांची जागा कोणीच घेऊ शकलेले नाही. क्वचितच कोणी असेल ज्याने पार्ले-जी बिस्किटे खाल्ली नसतील. पार्ले-जी हे बिस्किटच नसून हे लोकांचे इमोशनस् आहे.
असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या लहानपणाच्या सवयीमुळे आजही या बिस्किटाशिवाय दुसरे कोणतेही बिस्किट आवडत नाही आणि तेच खातात आणि आजही दुकानात कोणते बिस्किट घ्यायचे म्हणला की सर्वात पहिले ओठावर पार्ले-जी हे नाव येत, परंतु आजकाल या पार्लेने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. ज्यावर आता अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत ज्यावर यूजर्स वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत.
मागच्या वेळेस पार्ले-जी बिस्किट व्हायरल झाले होते ते त्या कवर फोटो वरील मुलगी आत्ता कशी दिसते आणि होय यावेळेस पुन्हा पार्ले-जी बिस्किट व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे ‘नवीन पॅकेट’ आणि ‘नवीन चव’. होय, आता काही वापरकर्त्यांनी ट्विटरवर पार्ले-जीच्या नवीन ‘अवतार’वर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी त्यांचे बालपणीचे दिवस आठवले आहेत. हे सर्व सुरू झाले जेव्हा ट्विटर वापरकर्त्याने @hojevlo ने Parle-G च्या पॅकेटचे चित्र शेअर केले.
फोटो शेअर करताना लिहिले- ‘मित्रांनो, नवे पार्ले-जी नुकतेच आले आहे.’ तुम्ही चित्रात पाहू शकता, हे सामान्य दिसणारे लाल पॅकेट नाही. पार्ले-जीचा नवा ‘अवतार’ पाहून बहुतेक ट्विटर यूजर्स हैराण झाले. या व्हायरल पॅकेटवर लिहिले आहे, ‘बिस्किटमध्ये बेरी आणि ओट्स आहेत.’
मग ते काय होते? ही पोस्ट पाहताच ती संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर, नवीन पॅकेट आणि फ्लेवर नेटिझन्समध्ये चर्चेचा मुद्दा बनला आणि आता इंटरनेट वापरकर्ते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की पार्लेने काही महिन्यांपूर्वी आपल्या बिस्किटांचे अनेक फ्लेवर्स जारी केले होते आणि हे पॅकेट देखील त्याचाच एक भाग होता. पार्ल्याचे हे नवीन बिस्किट चार-पाच महिन्यांपूर्वी आले आहे, हे सांगण्याचाही अनेक यूजर्सनी प्रयत्न केला आहे. तर, कोणीतरी लिहिले आहे, तो आमचा बालपणीचा मित्र आहे. बालपणीच्या आठवणी परत आल्या. अशा प्रकारे लोकांनी या बिस्किटशी संबंधित त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.