Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहर डिजिटल मीडिया संघाची कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार भीमराव तुरुकमारे यांची एकमताने निवड

अखिल मराठी पत्रकार संस्था (महाराष्ट्र राज्य) संलग्न पिंपरी चिंचवड शहर डिजिटल मीडिया संस्थेची कार्यकारिणी आज चिंचवड येथे जाहीर करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाची बैठक आज दुपारी १२.३० वाजता वाल्हेकरवाडी चिंचवड येथे पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव,महिला अध्यक्ष सायली कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड सोशल मिडिया कार्यकारिणी खालील प्रमाणे
1) अध्यक्ष- भीमराव तुरूकमारे
2) उपाध्यक्ष- शफीक शेख
3) चिटणीस- युनूस खतीब
4) कोषाध्यक्ष- मुकेश जाधव
5) समन्वयक- लक्ष्मण रोकडे
यावेळी गोरे म्हणाले की " डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत.त्यांचे आरोग्य,घर,संरक्षण रजिस्ट्रेशन असे अनेक प्रश्न आहेत. आगामी काळात या प्रश्नासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवाय डिजिटल मीडियाला महत्वाचे स्थान मिळाले पाहिजे यासाठी अखिल मराठी पत्रकार संस्था नेहमी कार्यरत राहील. येणाऱ्या महिनाभरात डिजिटल मीडिया संघाची स्थापना पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात करण्यात येणार आहेत.
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून प्रत्येकाना बॅग चे वाटप करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश मंगवडे, सरचिटणीस सुनील कांबळे, कोषाध्यक्ष जितेंद्र गवळी, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख -कलिंदर शेख सदस्य संतोष जराड,गणेश शिंदे,अमोल डं बाळे, अल्ताफ शेख ,सुहास आढाव,मुकुंद कदम, प्रितम शहा,पुणे प्रतिनिधी भारत नांदखेले,अनिल सिंघ, संतोष शिंदे, मावळ प्रतिनिधी सागर शिंदे, प्रफ्फुल ओव्हाळ आदी पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना दादाराव आढाव,सूत्रसंचालन महेश मांगवडे यांनी केली तर आभार गणेश शिंदे यांनी मानले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.