Soshal : भोर आणि वेल्हे तालुक्यातील पोलिस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

पुणे दिनांक २७ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) भोर उपविभागातील भोर .व वेल्हे तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदाकरिता १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा दोन्ही तालुक्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन स्थगित करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै रोजी २०२३ रोजी भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. पोलिस पाटील पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी प्रक्रियेबाबत कालबध्द कार्यक्रमानुसार मंगळवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती.
दरम्यान भोर व वेल्हा हे दोन्ही तालुके दुर्गम व डोंगराळ अतिवृष्टीप्रवण असून सद्यस्थितीमध्ये पावसाला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे. या तालुक्यात दरडगर्स्त गावे असून नैसर्गिक आपत्तीच्यादुष्टीने उपाययोजना करण्यात येत आहे. दोन्ही तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये घाट पर्वणक्षेत्र असून घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण अधीक असल्याने आवश्यक उपाय योजना करण्यात येत आहे.
दरम्यान आपत्ती व्यवस्थापनच्या कामात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच क्षेत्रिये स्तरावरील कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.ही परिस्थिती लक्षात घेता नियोजित परीक्षा घेणे प्रशासकीय कारणांमुळे शक्य होणार नसल्यांने १ ऑगस्ट रोजी नियोजित लेखी परीक्षा पुढील तारखे पर्यत तुर्त स्थगित करण्यात आली आहे. भोर उपविभागीय कार्यालयातून लेखी परीक्षा दिनांक व स्थळ व त्या पुढील कालबध्द कार्यक्रमा बाबत अवगत करण्यात येईल .अशी माहिती देण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.