Pune Dams : घाट माथ्यावर कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणे भरली १००% धरणातून विसर्ग सुरू

पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर प्रचंड कोसळणाऱ्या पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, मुळशी, पवना या सर्व धरणातून आता मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू असून धरणा पाणीसुद्धा सोडले जात आहे. त्यामुळे मुळा मुठा नदी पात्र भरून वाहत आहे. तसेच ओढ्या नाल्यांना पूर आला आहे.
घाट माथ्यावर प्रचंड प्रमाणात कोसळणाऱ्या पावसामुळे. पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे ओव्हर फुल झाली असून.सांडव्या वरुन पाणी वाहत आहे.तसेच धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.त्या मुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की नदीपात्रा शेजारी राहणाऱ्या लोकांनी विशेष करून काळजी घ्यावी नदीपात्रात उतरू नये. तसेच ओढ्या नाल्यांना वरून पाणी वाहत असताना प्रचंड विसर्ग असल्यामुळे आपली वाहने त्यात घालू नये असे सांगण्यात आले आहे.
सर्वच धरणा मधून आता प्रचंड विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने विसर्गामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. तसेच धरणा मधून आवश्यकतेनुसार आणखीन वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कॅनाल ओढे नाले ओसंडून वाहत आहे.तसेच नदीचं पात्र देखील ओसंडून वाहत आहे. दोनच दिवसांपूर्वी बाबा भिडे पूल नदी पात्रातील पाण्याखाली गेला आहे. वाढत्या विसर्ग मुळे शहरांमधील मुख्य रस्त्यावर देखील येऊ लागली आहे.
पुणे शहर व उपनगरात वाढत्या बांधकामामुळे व बिल्डर्स व अन्य नागरिकांनी कंपनी यांनी ओढे नाले यांचे पात्र आंरुद केल्या केल्यामुळे हाउसिंग सोसायटी व कॉलनी व अनेक कंपनी तसेच रस्त्यावर पाणी शिरण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना देखील प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी देखील आपली काळजी घेणे गरजेचे आहे.सोसायट्या मधील संरक्षण भिंती देखील पाऊसा मुळे पडण्याची शक्यता आहे.त्या मुळे भिंती शेजारी वाहने पार्किंग करु नये .व पाऊसात भिंती घ्या आडोशाला उभे राहू नये.हे देखील धोक्याचे आहे.याची नागरिकांनी काळजी घ्यावी.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.