Traffic on pune mumbai expressway : पुणे : सलग सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा, संथ वाहतूक

पुणे, 31 डिसेंबर 2022: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाट येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन आणि वीकेंडमुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक मंदावली आहे. लोणावळा, महाबळेश्वरला जाण्यासाठी पर्यटकांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा वापर करावा लागतो.
त्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर असून वाहतूक तुलनेने संथगतीने सुरू आहे. बोरघाटातील रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
अनेक नागरिक वीकेंड आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडले आहेत. लोणावळा आणि महाबळेश्वर सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी बहुतेक लोक पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा वापर करतात. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
महामार्ग पोलिस वाहतुकीचे नियमन करत आहेत आणि अवजड आणि हलकी वाहने वेगळी करत आहेत. अनेकदा बोरघाटात लेन तोडून वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला जातो.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.