Mansoon : राधानगरी धरण @ १००% भरले कोल्हापूर मध्ये ८० बंधारे पाण्या खाली पंचगंगा नदीने ओलंडली धोक्याची पातळी

पुणे दिनांक २६ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या मागिल आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागातील राधानगरी पाणलोट क्षेत्रांत व आजरा गगनबावडा भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राधानगरी धरणांच्या पाणी पातंळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. व धरण @ १००% टक्के भरले आहे. आज सकाळी धरणांचे एकूण ४ दरवाजे उघडले आहेत. या मधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाणी पातंळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने नदीची वाटचाल धोका पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे आपत्ती प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना खबरदारीचासुचना दिल्या आहेत.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणांच्या पाणी मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. हे धरण १००%टक्के भरले आसल्यांने या धरणाला असलेले स्वयंसचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत .सध्या धरण हे १००% टक्के भरल्यांने या धरणांचे आपोआप उघडतात .दरम्यान या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी आज सकाळी राधानगरी धरणांचे चार स्वसंचलित दरवाजे उघडले आहेत.
त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नदीच्या काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. व त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असल्याने पावसा मुळे पंचगंगा नदी सध्या इशारा पातळीच्या वरून वाहत असून राजाराम बंधा-यांची पाणीपातळीच्या ४० फुट ४ इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट आहे. पंचगंगा सध्या धोका पातळी पातळीकडे वाटचाल करत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८० बंधारे पाण्या खाली गेले आहेत. त्यामुळे आता शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. राधानगरी धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाच्या वतीने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.