Raigad: Two students from Aurangabad drowned in Kashid sea : रायगड : औरंगाबाद येथील दोन विद्यार्थ्यांचा काशीद समुद्रात बुडून मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचा काशीद समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि. 9) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
मुरुड तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळांवर शालेय सहलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून सहली येत आहेत. काशीद समुद्रकिनारा जगामध्ये प्रसिद्ध असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10वीचे विद्यार्थी आज दुपारी 3 च्या दरम्यान काशीद समुद्रकिनारा पाहण्यासाठी आले होते. सुमारे 80 विद्यार्थ्यांचा समूह काशीद समुद्रकिनारी उतरला होता.
यातील पाच जण काशीद समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले होते. पोहताना हे पाच जण खोल पाण्यात गटार खाऊ लागले. मुले बुडत असल्याचे आजूबाजूच्या लोकांना समजताच त्यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. आणि पाचपैकी तिघांना सुखरूप समुद्रकिनारी आणण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उर्वरित दोघे खोल पाण्यात गेल्याने त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. त्यातील एकाचा मृतदेह लगेच सापडला. मात्र दुसरा मुलगा सापडला नाही. यासाठी स्थानिक नागरिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम सुरू ठेवल्यानंतर काही तासांनंतर दुसरा मुलगा सापडला. सहलीवर गेलेले विद्यार्थी प्रणव कदम आणि रोहन बेडवाल हे अंदाजे १५ वर्षांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली. कृष्णा पाटील, तुषार वाघ व अन्य एक जण बचावला. त्यांना बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.