दु:खद : जेष्ठ विचारवंत व लेखक प्रा.हरी नरके यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे दिनांक ९ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जेष्ठ विचारवंत व लेखक हरी नरके यांचे निधन झाले.त्यांना ह्दयविकाराचा झटका आला होता.त्यांना तातडीने मुंबई मधील एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ते समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.
पुणे विद्यापीठ मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले होते.तसेच पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते.तसेच मराठी भाषा ही एक अभिजात भाषा आहे.हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे.त्यांनी काही पुस्तके देखील प्रसिद्ध केली आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Mumbai News, दु:खद News, Mumbai Social News, latest Mumbai marathi news and Headlines based from Mumbai City. Latest news belongs to Mumbai crime news, Mumbai politics news, Mumbai business news, Mumbai live news and more at Polkholnama.