वारकऱ्यांनसाठी आनंदाची न्यूज : कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरसाठी वारकऱ्यांनकरीता स्पेशल ट्रेन

पुणे दिनांक १४ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पंढरपूरच्या विठ्ठल व रुख्मिणीच्या चरणी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी कार्तिकी एकादशीला येतात व वारकऱ्यांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासनाने खास पंढरपूर करीता वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा निर्णय घेतला आहे.सोलापूर रेल्वे डिव्हीजनच्या वतीने विषेश रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे.त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
दरम्यान याप्रकरणी रेल्वे प्रशासनाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार मिरज -कुर्डवाडी ,मिरज - पंढरपूर व पंढरपूर - मिरज दरम्यान दिनांक २० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरच्या कालावधीत एकूण चार फेऱ्यांमध्ये या विषेश रेल्वे ट्रेन धावणार आहेत.रेल्वे ट्रेन क्रमांक ०१४४४ पढरपूर येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे.व मिरज येथे १२ वाजेपर्यंत पोहचणार आहे.व लगेच मिरज -पंढरपूर ही ट्रेन क्रमांक ०१४४४ मिरज येथून दुपारी १ वाजून १० मिनिटांनी सुटेल व पंढरपूरला ५ वाजता पोहोचेल.दरम्यान २१ते २५ नोव्हेंबर पर्यंत एकूण ४ फेऱ्यात धावणार आहे. मिरज - पंढरपूर रेल्वे ट्रेन क्रमांक ०१४४५ मिरजवरुन सकाळी ८ वाजता सुटेल व पंढरपूरला सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी पोहचणार आहे.तर पंढरपूर -मिरज रेल्वे ट्रेन क्रमांक ०१४४६ पंढरपूर येथून सकाळी ११ वाजता सुटेल व मिरज येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. मिरज -कुर्डवाडी -मिरज रेल्वे ट्रेन २१ ते २४ नोव्हेंबरप्रर्यत एकूण चार फेऱ्यात धावणार आहे.या संधीचा लाभ घेण्या साठी वारऱ्यांनी रेल्व ट्रेनचे वेळापत्रक पाहून लाभ घ्यावा व तिकट बुकिंग करावे ,असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.