Soshal : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जळगाव जिल्हाधिकारी पदी बदली

पुणे दिनांक २१ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) महाराष्ट्र राज्यातील एकूण ४१ सनदी अधिकांच्या आज तातडीने बद्दल्या करण्यात आल्या असून या मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची पुण्यातून जळगाव येथे जिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महसूल आणि वन विभागांचे आर.एस.चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आता पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारतील .
दरम्यान आयुष प्रसाद हे अकोला येथील येथे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते .तिथे एक वर्ष कामकाज केल्या नंतर त्यांची बदली पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज पाहिले .आता प्रसाद यांची बदली जळगाव येथे जिल्हाधिकारी या पदावर झाली आहे. महाराष्ट्र सरकारने आज एकूण ४१ सनदी अधिकारी यांच्या बद्दल्या करण्यात आल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.