PMC : परवानगीशिवाय भिंत रंगवल्याबद्दल हाउसिंग सोसायटीने चक्क पीएमसीला नोटीस पाठवली

"पुणे तिथे काय उणे" हा वाक्याचा परिचय पुन्हा झाला. परवानगीशिवाय निवासी संकुलाची भिंत रंगवल्याने एका सोसायटीने चक्क पुणे महानगरपालिकेचे (पीएमसी) प्रशासक विक्रम कुमार यांना नोटीस बजावली. कोथरूडमधील स्वप्नशिल्प हाउसिंग सोसायटीने कर्वेनगर वॉर्ड ऑफिसने सोसायटी ची परवानगी न घेता निवासी संकुलाची भिंत रंगवल्याने ही नोटीस बजावन्यात आली.
पीएमसीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आम्ही 484 फ्लॅटची सोसायटी आहोत आणि आम्ही पीएमसीला सुमारे 50 लाख रुपये कर भरतो. आमच्या सोसायटीच्या पश्चिमेला 400 फूट लांब आणि सात फूट उंच भिंत आहे. पुणे महापालिकेच्या कर्वेनगर विभागीय कार्यालयाने सोसायटीच्या परवानगीशिवाय भिंतीला रंगरंगोटी केली. 2003 च्या PMC जाहिरात धोरणानुसार, भिंत रंगवण्यापूर्वी मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC) अनिवार्य आहे अन्यथा PMC भिंतीवर रंग लावलेल्या व्यक्तीला दंड आकारू शकते.
“जर पीएमसी नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला दंड करू शकते, तर तेच पीएमसीला लागू होते. पीएमसीला नोटीस दिल्यानंतर, त्यांनी भिंती पुन्हा रंगवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे, परंतु सध्या त्यांच्याकडे तसे करण्याची तरतूद नाही,” कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीचे सचिव प्रशांत भोलागीर यांनी सांगितले.
वारजे, कर्वेनगर विभागीय कार्यालयाच्या पत्रात असे म्हटले आहे की “केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीएमसीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहराचे सौंदर्यीकरण करत आहोत. सुशोभीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही सामान्य लोकांसाठी सामाजिक जागरूकता संदेशांसह भिंती रंगवतो. पीएमसी या उपक्रमातून पैसे कमवत नाही.”
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.