पुणे महापालिकेच्या वतीने पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू : डेक्कन बसस्थानक ते भिडे पुलाजवळील रस्ता दोन महिने वाहतुकीसाठी बंद

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणेकरांनसाठी वाहतुकीसाठी सगळ्यात महत्त्वाचा असलेला भिडे पुलासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली असून भिडे पुलाजवळील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.दरम्यान या भागात पुणे महानगरपालिकेच्या वतीने पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले जाणार आहे.त्यामुळे हा पुल आता तब्बल दोन महिने पुणेकर नागरिकांना वापरतात येणार नाही.मात्र या करिता प्रर्यायी मार्ग देण्यात आले आहे.पुणेकरांनी या प्रर्यायी मार्गाचा वापर करावा.असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान कामासाठी भिडे पुल बंद करण्यात येणार असल्यांने पुणेकर नागरिकांना वळसा घालावा लागणार आहे.डेक्कन जिमखाना ते पीएमपी स्थानक ते भिडे पुल दरम्यान पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम १६ ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात येणार आहे.साधरण १५ डिसेंबर प्रर्यत सुरू राहणार आहे.गरजभासल्यास केळकर रस्ता मार्गे भिडे पुलावरून डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.