Soshal. : " हे आहे गुजरातचे माॅडेल "? फक्त दीड महिन्या पूर्वी उद्घाटन झालेल्या पूलावरील रस्ता मधोमध खचला

पुणे.दिनांक २९.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) गुजरात मधील सुरत येथे वापी नदी वर बांधण्यात आलेल्या वारिया व वेद पुला वरील रस्ता अगदी मधोमध खचला आहे. याबाबत धक्कादायक बाब म्हणजे अशी की तब्बल ११८.कोटी रूपये खर्च करून हा पूल बांधला होता व केवळ दीड महिन्यांन पूर्वीच या पूलाचे मुख्यमंत्री भूपेद्रं पटेल यांच्या हस्ते उद्घाटन होऊन तो वाहतूकी साठी चालू केला होता. त्या मुळे हेच आहे का " गुजरात चे माॅडेल " असा संतप्त सवाल केला जात आहे.
सदरच्या पुला करीता तब्बल ११८.कोटी रूपये खर्च करून हा पूल वापी नदीवर बांधण्यात आला होता. या पूलाचे १७.मे रोजी मुख्यमंत्र्याच्या उद्घाटन करण्यात आले होते. वारिया व वेद या दोन गावांना जोडण्या करिता हा पूल बांधण्यात आला. होता. दीड किलोमीटर अंतर आसलेला या पूलाला चार लेन आहेत. मागील २४.तासांन पसून गुजरात मध्ये पाऊस पडत आहे.पहिल्याच पाऊसात या पुलाच्या अगदी मधोमध आता रस्ता खचल्याने त्याच्या कामावरून आता प्रश्ननं उभे केले जात आहेत. तसेच सरकारवर टीका केली जात आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.