बाप्पाच्या आगमनासाठी पुणेकर झाले सज्ज : आज गणेश चतुर्थी पुणे शहरातील पाच मानाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना धुमधडाक्यात होणार

पुणे दिनांक १९ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गणेश चतुर्थी गणेशोत्सवाला आज पासून धुमधडाक्यात सुरुवात होणार आहे.या करीता पुणेकर सज्ज झाले आहेत.आज मानाच्या पाचही गणेशाची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात होणार आहे.
पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे.तर डॉ.आंनद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. तत्पूर्वी सकाळी आठ वाजता उत्सव मंडपातून मिरवणुकीची सुरूवात होणार आहे.मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी पावणे बाराच्या सुमारास होणार आहे.श्री समर्थ घराण्यातील अकरावे वंशज व सज्जनगड येथील भूषण महारुद्रा स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठापना होणार आहे.तत्पुरवी उत्सव मंडपा मधून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम मंडळाची प्रतिष्ठापना पावने दोन वाजता होणार आहे.पुनीत बालन व जान्हवी धारीवाल-बालन यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.तत्पुरवी सकाळी साडे नऊ वाजता मिरवणूक उत्सव मंडपातून 🥁 ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक सुरू होणार आहे.मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती तुळशीबाग मधून प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखी मधून प्राणप्रतिष्ठापनाची मिरवणूक सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे.दि पून्हा मर्चट्स चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया व जयराज कंपनीचे राजेश शहा यांच्या शुभहस्ते साडेअकरा वाजता गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.पाचवा मानाचा गणपती केसरी वाडा गणपतीची प्रतिष्ठापना टिळक पंचांग नुसार १७ ऑगस्टला झाली आहे.व पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. हे होते पुण्यातील मानाचे पाच गणपती बाप्पाचे वाजत गाजत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.