Soshal : आज एकादशी विठू नामाच्या गजराने पंढरीनगरी दुमदुमली. अडीच लाख भाविक पंढरपूरात दाखल

पुणे दिनांक २९ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)अधिक मास महिन्यातील आज कमला एकादशी आहे. व आज एकादशीच्या निम्मित पंढरपूरात भक्तीचा महासागरच मोठ्या प्रमाणावर लोटला आहे. यात जवळपास अडीच लाखांन पेक्षा जास्त भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. विठू माऊलीच्या दर्शनाकरीता तीन किलो मीटर पर्यंत दर्शन रांग लागली आहे. दर्शनासाठी एकंदरीत आठ तास लागत मंदिर व पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था ठेवण्यातआली आहे.
दरम्यान सध्या अधिकमास महिना चालू असून आज कमला एकादशी आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरात दाखल होत आहे. या भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीने भक्तांची काळजी घेत आहे. अधिक मास व त्यात आज कमला एकादशी आहे. त्यामुळे पंढरपूरात भाविकांचा मोठ्या प्रमाणात जनसागर दाखल झाला आहे. एकादशीच्या निम्मितांने पवित्र चंद्रभागेच्या नदीत स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
दरम्यान अधिक मास महिन्यात पवित्र चंद्रभागेच्या नदीत स्नान व विठू माऊलीचे दर्शन या काळात पवित्र मानले जाते. त्यामुळे आज पंढरपूरात भाविकांचा जनसागर लोटला आहे. विठ्ठल मंदिरापासून जवळपास तीन किलोमिटर लांब अंतरावर दर्शनांची रांग लागली आहे. दर्शनासाठी एकंदरीत ८ ते १० तासांचा वेळ लागत आहे.पंढरपूरात विविध मठ आणि धर्मशाळा मध्ये विठू माऊलीचा गजर चालू आहे. व अखे पंढरपूरात आज विठू नामाच्या जयघोषांने अवघे पंढरपूर दुमदुमून गेले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.