सोन्याच्या पावलांनी आली गौराई ! : आज घरोघरी जेष्ठ गौरींचे आगमन

पुणे दिनांक २१ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज संपूर्ण महाराष्ट्रात जेष्ठ गौरीचे घरोघरी आगमन होत आहे.हा महाराष्ट्राती हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे.ही देवी गौरी म्हणजेच पार्वतीला समर्पित आहे.हा सण जेष्ठ गौरी आवाहना नंतर सुरू होतो.हा सण तीन दिवस चालतो आज जेष्ठ गौरी पूजन होते व त्यानंतर तीन दिवसांनी गौरी विसर्जन नंतर समाप्त होतो.याला गौरी पूजन व जेष्ठ गौरी पूजन म्हणून देखील म्हटले जाते.
हिंदू सण असल्याने विवाहित स्त्रिया करीता अंत्यंत महत्त्वाचा हा सण आहे.हिंदू धर्माच्या स्रिया आपल्या कुंटूंबातील मुलांच्या व घरातील सदस्यांचा प्रगती व चांगल्यासाठी तीन दिवस उपवास करतात.व अखंड सौभाग्यप्राप्ती साठी हिंदू धर्मातील स्रिया भाद्रपद महिन्यात शुध्द पक्षात गौरींचे पूजन करतात गौरी आवाहन पहिल्या दिवशी घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापना प्रर्यत रांगोळी व पाऊलांचे ठसे काढले जातात व घरातील ज्येष्ठ सुवासिनच्या हातात मुखावटे असलेले ताटातून ताट चमच्याच्या सहाय्याने वाजवत आगमन करतात व गौरीची विधीवत पूजा करून स्थापना करतात.गौरीपुढे धान्यांच्या रास ठेवतात व फळ फळे ठेवतात.गावा गावातील प्रथे प्रमाणे नैवेद्य दाखवला जातो.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.