Kojagiri and Eid-e-milad : पुणे शहरात कोजागिरी व ईद- ए - मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमुळे वाहतूक बदल

पुणे शहरात रविवारी 9 ऑक्टोंबर ला कोजागिरी पौर्णिमा तसेच हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त नाना पेठ शुक्रवार पेठ भवानी पेठ रामोशी गेट एमडी काम चौक व नरपत गिरी चौक या मार्गावरून मिरवणुका निघणार असून वाहतूक पोलिसांनी या मार्गात बदल केला आहे.
ईद-ए-मिलाद व कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी साजरी होत आहे तसेच हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यात येणार आहे मनुशहा मस्जिद नाना पेठ येथून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या मिरवणुकीत ट्रकची परीक्षा वाहनांचा समावेश असतो. तसेच कोजागिरी पौर्णिमा निमित्त देखील याच दिवशी सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या वतीने एकूण पंधरा मिरवणुका निघणार असून. या भवानी पेठ रामोशी गेट एडी कॅम्प चौक नरपत गिरी चौक या भागातून निघणार आहेत. त्यामुळे वाहतूक कुंडी मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्यामुळे वाहतूक विभागांनी काही बदल केले आहे सदरचे बदल नागरिकांनी लक्षात घ्यावे असे वाहतूक विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.