Soshal. : आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांच्या गाड्या अडवल्या.मुख्यमंत्री यांच्या आदेशाच्या "टोल धाड वाल्यांकडून "तीन तेरा नऊ बारा.

पुणे.दिनांक १० ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम)आषाढी वारी निमित्त संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील वारकरी यांच्या वाहनांचा टोल घेऊ नये त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने या काळात टोल माफी जाहीर केली आहे.असे आदेश सर्व टोलनाक्याःना देऊन देखील सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाक्यावर " टोलधाड वाल्यांकडून " वारकऱ्यांच्या दिंडीच्या गाड्य आडवलया सदरचा टोलनाका हा महाराष्ट्रातील सर्वात 'गरीब उद्योग समूह पैकी एक रिलायन्स कडे असल्याचा समजते '
आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या ह्या पुण्याच्य दिशेने आंळदी व देहूकडे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या नामघोषाने निघाल्या आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांच्या दिंडीच्या वाहनांना संपूर्ण महाराष्ट्रात टोलमाफी जाहीर केली आहे.असे असतांना देखील " महाराष्ट्र राज्यातील सर्वात गरीब उद्योग समूहाला याचा विसर पडला. व सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसूल करण्याचे कंत्राट या उद्योग समूहाकडे आहे.या टोलधाड नाक्यावर शुक्रवारी सांयकाळी पश्चिम महाराष्ट्रातून पुण्याच्या दिशेने आंळदी व देहूकडे येणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्या आडविलयाचे सूत्रांकडून कळत आहे.
वारकऱ्यांच्या गाड्या आडविलया नंतर वारकरी यांनी टोल नाक्यावरच. टाळ ढोल. मृदुंग चिपळ्या पखवाज वाजवत भजन कीर्तन चालू करून आपले आंदोलन चालू.केले.त्या मुळे टोल नाक्यावर गाड्याच्या रांगाच रांगा लागल्या त्या मुळे पोलीसांची चांगलीच तारांबळ उडाली. त्या नंतर पोलीसांकडून टोल नाका प्रशासन बरोबर चर्चा करून वारकऱ्यांना टोल नाका वरील मार्ग मोकळा करून दिला. व तणावाचे वातावरण निवाळले. व वारकरी पुण्याच्य दिशेने आंळदी व देहूकडे रवाना झाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.