2 days Water supply will be shut off in pune : पुण्यामध्ये २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच ५ जानेवारी व ६ जानेवारी विस्कळीत होणार आहे. ५ जानेवारी कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील पुणे मेट्रोचे कामांतर्गत पाण्याची मुख्य वितरण नलिका शिफ्ट करावी लागणार असल्याने आहे, तसेच चांदणी चौक येथे प्रथमेश सोसायटी लगत कोथरूड भागाला पाणी पुरचदा करणारी १६ इंची एम. एस. जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी खालील भागातील पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.
खाली दिलेल्या भागात पाणीपुरवठा नाही होणार
शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसर, मिलनकोट, पीत गल्ली, मिना ऑफिस परिसर मोदीबाग परिसर नरवीर तानाजी वाडी, पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, पाटील इस्टेट इ कोथरूड भागातील शास्त्रीनगर, लोकमान्य कॉलनी, उजवी, डाबी भुसारी कॉलनी, वेद भवन रोड वरील भाग डुक्करखिंड हिलव्हिव सोसायटी ब्रहम रॉयल सोसायटी, परमहंसनगर, चडावरचा भाग लक्ष्मीनगर, राहुल टॉवर, मुठेश्वर कॉलनी, गुरुजन सोसायटी इ. या ठिकाणी पानीपुरवठा होणार नाही.
तसेच वरील भागाचा पाणी पुरवठा दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.०६/१/२०२३ रोजी उगव कमी बाबाने होण्याची शक्यता आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.