Soshal : सकाळी कामावर जायच्या वेळी रेल्वेने अचानक पणे प्लॅटफॉर्म बदलला चाकरमान्यांनी लोकलच रोखवली

पुणे दिनांक ९ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळी दिवा रेल्वे स्टेशन येथील मुंबईच्या दिशेने फास्ट जाणारी लोकल नियमित येणाऱ्या प्लॅटफॉर्म वर नेता अचानक पणे दुसऱ्याच प्लॅटफॉर्म वर आल्यानं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.त्यामुळे संतापलेल्या चाकरमान्यांनी लोकलच रोखून धरली यावेळी १०मिनिटांन पेक्षा जास्त वेळ रोखून धरली अखेर याबाबत चाकरमान्यांनी रेल्वे प्रशासनांच्या वतीने समजूत काढल्यानंतर नंतर रेल्वे लोकल पुढे रवाना झाली आहे.
दरम्यान याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले की मुंबईच्या दिशेने जाणारी फास्ट लोकल दिवा स्टेशन वर प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर नयेता ती दोनवर आली व तसेच सदरची लोकल वीस मिनिटे धावत होती.त्यामुळे चाकरमनी चांगलेच संतापले व त्यांनी ही लोकल रोखून धरली .संत्पत झालेल्या चाकरमान्यांनी रेल्वे प्रशासनाच्या वतीने समजूत काढल्यानंतर सदरची लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.