श्रावणमास : श्रावण महिन्यास आजपासून प्रारंभ श्रावणात का केली जाते श्रावण शिवपूजा?

पुणे दिनांक १७ऑगस्ट( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आजपासून श्रावण महिन्यास प्रारंभ होत आहे.धार्मिक अनुष्ठान. व्रत वैकल्ये करण्यासाठी म्हत्वाचा अन् सणांच्या रेलचेल असणारा नीज श्रावण महिना आजपासून दिनांक १७ऑगस्ट पासून सुरू होत आहे सर्व मंदिरांन मध्ये या पवित्र महिन्याच्या स्वागतासाठी तयारी सुरू आहे हिंदू पंचांग नूसार तीन वर्षांनी अधिक मास येतो.चालू वर्षी श्रावण मास असल्या मुळे नीज श्रावण मास सुरू होण्यास एक महिन्याच्या उशिरा झाला आहे.या श्रावण मास कालावधी १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत असणार आहे.
आजपासून प्रारंभ होणाऱ्या श्रावण मास हा पवित्र मास १५ सप्टेंबर पर्यंत आहे.हा महादेवाचा महिना मानला जातो.व महिनाभर शिवाची विशेष पूजा केली जाते.दक्षिणायनात श्रावण येतो.याचे आराध्य दैवत शिव आहे.श्रावणात पावसाळा असतो.पुराणानुसार भगवान शिवला अर्पण करण्यात येणारी फुले व पाने पावसाळ्यात येतात त्या मुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे.दूध दही व त्या पासून बनवलेले वस्तू कढी.कोशिंबीर या पदार्थांचे सेवन या महिन्यात करु नये.व श्रावण महिन्यात दाढी व केस कापू नये.श्रावनात मद्यपान करु नये.श्रावनात वांगं 🍆 खाणं टाळावं.व श्रावणांत अंडी खाणं टाळावं.तसेच या पवित्र महिन्यात मांसाहार करु नये.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.