महाराष्ट्रांचे कुलदैवत : येळकोट येळकोट जय मल्हार... जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा लाखो भाविक गडावर दाखल

पुणे दिनांक १३नोव्होंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रांचे कुलदैवत असलेल्या खंडोबाची जेजुरी पिवळ्या सोन्याने म्हणजेच भंडाऱ्यांनी न्हाऊन निघाली आहे.आज जेजुरीच्या खंडेरायांची सोमवती यात्रा आहे.आज लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने जेजुरी गडावर दाखल झाले आहेत.आज सकाळी सात वाजता खंडेरायांची पालखी नीरा नदीवर स्नानासाठी दाखल झाली आहे.दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास खंडोबा व म्हाळसा देवीच्या मूर्तीची क-हानदीवर स्नान सोहळा झाल्यावर पुन्हा जेजुरी गडावर पालखी येणार आहे.
दरम्यान जेजुरी गडावर मंदिर समितीच्या वतीने भाविकां साठी केली असून पार्किंग व्यवस्था.पाण्याची व्यवस्था व प्रसादाची व्यवस्था.व करण्यात आली आहे.जेजुरी मध्ये भाविकांना साठी दुकानं सज्ज झाले आहेत.दरम्यान काल पासून असंख्य भाविक गडावर दाखल झाले आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खांदेकरांना विशिष्ट प्रकारचे ड्रेस कोड दिले आहेत.तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी चहा व नाष्टाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.दरम्यन यात यात्रे निमित्त येणाऱ्या भाविकांच्या वाहंना साठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून.वाहतूकी मध्ये देखील अनेक म्हत्वाचे बदल करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.