All india police wrestling competition : अखिल भारतीय पोलीस रेसलिंग स्पर्धा वानवडी येथे सुरू - महाराष्ट्र महिला पोलीस आघाडीवर

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक.१ व २ वानवडी पुणे येथे ७१ वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग स्पर्धा चालू झाली असून सदर स्पर्धेमध्ये भारत देशामधून सर्व राज्यातील राज्य पोलिसांघव केंद्रशासित प्रदेश व अर्धसैनिक बल यांचे संघ यामध्ये सहभागी झाले आहेत.
१६. नोव्हेंबर पासून पाॅवर लिफ्टिंग कबड्डी कुस्ती व क्रीडा प्रकारच्या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे. या स्पर्धेत पाॅवर लिफ्टिंग महिलांच्या क्रीडा विभागात महाराष्ट्र राज्य पोलीस संघाच्या ४७. किलोग्राम वजनी गटात महाराष्ट्र पोलीस शिपाई संगीता ढोले ह्या तर ५७ किलोग्राम वजनी गटात महाराष्ट्र पोलिस नायक योगिता बागुल यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर ६३ किलोग्रॅम वजनी गटात महाराष्ट्र पोलीस नायक विनया माने यांनी रौप्य पदक मिळवून महाराष्ट्र पोलीस संघाचे वर्चस्व कायम राखले आहे.
तसेच कुस्तीमध्ये ५५ किलोग्राम ( ग्रीको रोमन ) या क्रीडा प्रकारातील पुरुष गटात महाराष्ट्र पोलीस संघाचे पोलीस शिपाई संदीप बिराजदार यांनी रौप्य पदक मिळवून महाराष्ट्र कुस्ती पोलीस संघाचे पदकाचे खाते उघडले आहे. सदरची ही स्पर्धा २० नोव्हेंबर पर्यंत वानवडी येथील पोलीस राज्य राखीव पोलीस दल क्रमांक १ व २ या ठिकाणी चालणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.