FIFA WC : अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्स सोबत सामना होईल

FIFA विश्वचषक 2022 मध्ये अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 16 फेरीचा सामना 4 डिसेंबर रोजी IST 12:30 AM वाजता अहमद बिन अली स्टेडियमवर हा सामना झाला.
अर्जेंटिनासाठी या सामन्यात कर्णधार लिओनेल मेस्सी आणि युवा स्टार ज्युलियन अल्वारेझ यांनी गोल केले. मेस्सीने 35व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल केला. वरिष्ठ स्तरावरील हा त्याचा 1000 वा सामना होता.
अर्जेंटिनाने शनिवारी (3 डिसेंबर) रात्री ऑस्ट्रेलियाचा पराभव करून फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. अटीतटीच्या लढतीत त्याने 2-1 असा विजय मिळवला. आता अंतिम-8 मध्ये त्याचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. नेदरलँड्सने प्री-क्वार्टर फायनलमध्ये अमेरिकेचा पराभव केला. शुक्रवारी (9 डिसेंबर) अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे.
अर्जेंटिनासाठी या सामन्यात कर्णधार लिओनेल मेस्सी आणि युवा स्टार ज्युलियन अल्वारेझ यांनी गोल केले. मेस्सीने 35व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल केला. वरिष्ठ स्तरावरील हा त्याचा 1000 वा सामना होता. त्याने आपल्या संस्मरणीय सामन्यात गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या 1000 सामन्यांमध्ये 779 गोल आणि 338 असिस्ट आहेत. तसेच त्याच्या पाचव्या विश्वचषकात त्याने नॉकआऊट सामन्यात प्रथमच गोल केला.
अर्जेंटिनाचा संघ विश्वचषकाच्या इतिहासात दहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. आतापर्यंत त्यांना चार वेळा उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. 1966, 1998, 2006 आणि 2010 च्या शेवटच्या-8 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. प्रत्येक वेळी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवून संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत ती कधीही हरली नाही. दोन फायनल जिंकल्या आणि तीन हरल्या.
तत्पूर्वी, नेदरलँड्सने पहिल्या उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेचा ३-१ असा पराभव केला. 2002 नंतर अंतिम-8 गाठण्याचे अमेरिकन संघाचे स्वप्न भंगले. नेदरलँड्सच्या सामन्यात मेम्फिस डेपेने पहिला गोल केला. त्याने 10व्या मिनिटालाच संघाला आघाडी मिळवून दिली. त्याच्या पाठोपाठ डेली ब्लाइंडने हाफ टाईमच्या आधी गोल करून संघाला २-० ने पुढे नेले. 76व्या मिनिटाला हाजी राईटने युनायटेड स्टेट्ससाठी गोल केला, परंतु पाच मिनिटांनंतर डेन्झेल डम्फ्रीजने नेदरलँडची आघाडी 3-1 अशी वाढवली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.